सूचना! आपल्याला नोंदणी करण्या अगोदर रेजिस्ट्रेशन करावे लागेल त्या नंतर लॉगिन करून नोंदणी करावी

Parli vaijnath temple

परळी वैद्यनाथ - Parli Vaijnath Temple

परळी वैजनाथ Parli Vaijnath Temple हे बारा ज्योतिर्लिंग मंदिरांपैकी एक आहे. हे ज्योतिर्लिंग भारतातील महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे दक्षिण मध्य रेल्वेवरील एक स्थानक आहे. परळी वैजनाथ हे परळी वैद्यनाथ म्हणूनही ओळखले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी वैद्यनाथ जयंती असते.तसेच ते परळी वैजनाथ तालुक्याचे मुख्य ठिकाण/मुख्यालय आहे.

परळी येथील वैद्यनाथ मंदिर Parli Vaijnath Temple प्रसिद्ध असून भारतातील १२ ज्योतिर्लिंगांत परळीच्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत समजले जाते. हे मंदिर देवगिरीच्या यादवांच्या काळात त्यांचा प्रधान श्रीकरणाधिप हेमाद्री याने बांधले आहे, असे म्हणतात. पुण्यश्लोक राणी अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायऱ्या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैद्यनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत. मंदिरापासून जवळच तीन किलोमीटर अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे.

जवळच्या अंबेजोगाईपासून परळी वैजनाथ २५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६० कि.मी. अंतरावर आहे. या ठिकाणांपासून वैजनाथला जाण्यासाठी वाहनाची सतत सोय आहे. परळी येथे एक औष्णिक विद्युतकेंद्र आहे. येथे औद्योगिक वसाहत आहे.

परळी वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाची आख्यायिका

राक्षसांनी केलेल्या अमृत मंथनातून चौदा रत्ने बाहेर पडली होती. धन्वंतरी आणि अमृत ही त्यापैकीच दोन रत्ने होती. जेव्हा राक्षस अमृत घेण्यासाठी धावले, तेव्हा श्री विष्णूने धन्वंतरीसह अमृत शिवलिंगात लपवले. राक्षसांनी जेव्हा त्या शिवलिंगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या शिवलिंगातून ज्वाला बाहेर पडू लागल्या. पण, जेव्हा शिवभक्तांनी त्याला स्पर्श केला, तेव्हा त्यातून अमृताचा प्रवाह बाहेर येऊ लागला. मान्यता आहे की, परळी वैद्यनाथ हे तेच शिवलिंग आहे. अमृतयुक्त असल्याकारणानेच याला ज्योतिर्लिंगाला वैद्यनाथ (आरोग्याचा देव) म्हणतात.

2000 वर्ष जुने मंदिर History of Parli Vaijnath Temple

अशी मान्यता आहे की, परळी वैद्यनाथ मंदिर सुमारे 2000 वर्षे जुने आहे. या मंदिराचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी 18 वर्षे लागली. सध्याच्या मंदिराचा जीर्णोद्धार इंदूरच्या शिवभक्त महाराणी देवी अहिल्याबाई होळकर यांनी अठराव्या शतकात केला होता. हे तीर्थक्षेत्र अहिल्या देवीला अत्यंत प्रिय होते असंही म्हणतात.

कसे जातात? – परली वैजनाथ Parli Vaijnath Templ

परळी वैजनाथ ज्योतिर्लींगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना रेल्वे व बसेसची सुविधा आहे. परळी येथुन परभणी मार्गे मुंबई, अकोला, नांदेड, नागपुर, तेलंगणा राज्य व लातुर मार्गे आंध्रप्रदेश, कर्नाटका व पश्चीम महाराष्ट्रात जाण्या येण्यासाठी रेल्वेची सोय आहे. परळी येथुन राज्यासह आंध्रप्रदेश व कर्णाटका राज्यात बसची सुविधा आहे.

Parli

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to top