सूचना! आपल्याला नोंदणी करण्या अगोदर रेजिस्ट्रेशन करावे लागेल त्या नंतर लॉगिन करून नोंदणी करावी

Tuljapur

श्री तुळजाभवानी मंदिर - तुळजापूर Tuljapur Temple

महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तुळजापूर Tuljapur येथे वास्तव्य आहे. तुळजापूर हे गाव सोलापूर – छ. संभाजी नगर रस्त्यावर असून सोलापूरहून ४२ कि.मी. तर उस्मानाबादहून २२ कि.मी. अंतरावर आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांना भवानी तलवार देउन हिंदवी स्वराज्य स्थापनेचा आशीर्वाद देणारी तुळजापूरची हि देवी भवानी माता महिषासुर मर्दिनी, तुकाई, रामवरदायिनी, जगदंबा अदी नावानी ओळखली जाते. जगदंबा मातेची मूर्ती गडकी शिळेची असून ती अष्टभुजा आहे. आश्विन व चैत्र पूर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. यात्रेला देशभरातून लाखो भाविक येत असतात.

भवानी देवी - तुळजापूर देवी Tuljapur Devi

महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे.

हे गाव बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या मते हे १७ व्या किंवा १८ व्या शतकातील मंदिर आहे.
स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीची अवतार कथा आहे. कृतयुगात कर्दम ऋषीपत्नी अनुभूती तपस्येत असताना, कूकर या दैत्याने तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला. तपस्वी अनुभूतीने पावित्र्य रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला. देवी भगवती साक्षात प्रगटली व कूकर या दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला. साध्वी अनुभूतीच्या विनवणीवरून देवी भगवतीने या पर्वतराईत वास्तव्य केले. भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता-तुरजा-तुळजा (भवानी) या नावाने ओळखली जाते.

संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात – श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात – धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात.

येथील मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजास ‘परमार’ दरवाजा म्हणतात. जगदेव परमार या महान देवीभक्ताने आपले मस्तक सात वेळा देवीला अर्पण केले, अशी श्लोकरचना या दरवाजावर कोरली आहे. सभामंडपात पश्र्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात, पूर्वाभिमुख अशी श्री तुळजाभवानी देवीची रेखीव व प्रसन्न मूर्ती आहे. मूर्ती गंडकी शिळेची असून प्रमाणबद्ध आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी असे देवीचे मनोहर रूप आहे. देवी भवानीची ही स्थलांतर करता येणारी मूर्ती आहे. वर्षातून तीनवेळा ही मूर्ती मंचकी (पलंगावर) विसावते. असे इतरत्र कोठेही आढळत नाही. गर्भगृहाच्या भिंतीवर छोटी-छोटी आकर्षक शिल्पे आहेत. सभामंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह असून इथे चांदीचा पलंग आहे.

श्री तुळजाभवानी मंदिर - तुळजापूर Shri Tuljabhavani, Tuljapur- Live Darshan

तुळजाभवानी फोटो - Tulja bhavani photo

Tuljapur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to top