Pandurang Aarti

Pandurang Aarti

पांडुरंगाची आरती | Pandurang Aarti

युगें अठ्ठावीस विटेवरी उभा ।

वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।।

पुंडलिकाचे भेटी परब्रह्म आले गा ।

चरणी वाहे भीमा उध्दरी जगा ।।१।।

जयदेव जयदेव जय पांडुरंगा ।

रखुमाई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा ।

जयदेव जयदेव ।।धृ।।

तुळसी माळा गळां कर ठेवूनी कटीं ।

कासे पितांबर कस्तूरी लल्लाटी ।

देवसुरवर नित्य येती भेटी ।।

गरूड हनुमंत पुढे उभे राहती ।।

जयदेव जयदेव ।।२।।

आषाढी कार्तिकी भक्त जन येती ।

साधु जन येती।

चंद्रभागेमाजी स्नानें जे करिती दर्शनहेळामात्रे तयां होय मुक्ति ।

केशवासी नामदेव माधवासी नामदेव, भावें ओंवाळितीं ।।

जयदेव जय पांडुरंगा ।।३।।

 

Share this article:
Previous Post: Kirtan | कीर्तन

October 6, 2024 - In माहिती

Next Post: Hanuman Chalisa

October 8, 2024 - In आरती

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.