सूचना! आपल्याला नोंदणी करण्या अगोदर रेजिस्ट्रेशन करावे लागेल त्या नंतर लॉगिन करून नोंदणी करावी

Pandharpur

Pandharpur

पंढरपूर - Pandharpur

पुण्यभूमी म्हणून प्रसिद्ध असलेले पंढरपूर Pandharpur हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील भीमा (चंद्रभागा) नदीच्या काठावर वसलेले एक लोकप्रिय तीर्थस्थान आहे. सोलापूर शहरापासून जवळ असलेल्या या शहराचे प्रशासनिक क्षेत्र जिल्ह्यातील अकरा तालुक्यांपैकी एक आहे. सोबतच ते महाराष्ट्र विधानसभेच्या मतदारसंघा पैकीही एक आहे. येथील विठ्ठल मंदिर हे जून-जुलै दरम्यान येणाऱ्या आषाढी यात्रेत हिंदू भाविकांना आकर्षित करते

पंढरपूरचे विठोबा मंदिर हे कोट्यवधी हिंदू भाविकांचं आराध्य दैवत तसेच महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या विठ्ठलाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिरामुळे पंढरपुरला दक्षिण काशी म्हणतात.

पंढरपूर मंदिर इतिहास - Pandharpur Temple History

इसवी सन ५१६ मध्ये सापडलेल्या ताम्रपटापासून पंढरपूरचा आणि त्याच्या आसपास असणाऱ्या काही गावांचा उल्लेख आढळतो. याबरोबरच देवळाचा ‘ लहान माडू ( देऊळ) उल्लेखही नंतरच्या काही शीलालेखांमध्ये पाहायला मिळतो. विशेषतः बाराव्या शतकात सापडलेल्या ‘ ८४ वा लेख ‘ हा शीलालेख सध्याच्या मंदिराबाहेर उत्तरेकडच्या भिंतीवर लावण्यात आला आहे. आधीच्या देवळानंतर ८४ वर्षांनी या देवळाचा जीणोर्द्धार झाला आहे असे समजुन ८४ लक्ष योनीतून मुक्ती मिळण्यासाठी भाविक त्याला पाठ घासून मगच देवळात प्रवेश करतात. यामुळे हा शीलालेख झिजल्याने त्यास आता तारेचं कुंपण बसवलं आहे.

गाभारा, अंतराळ आणि सभामंडप हे आताच्या देवळाचे मुख्य घटक असून सभामंडपाच्या १६ खांबांपैकी एकावर चांदीचं आवरण बसवलं असून तोच गरूडस्तंभ म्हणून ओळखला जातो.सोळाव्या शतकात विजयनगरच्या कृष्णदेवरायाने भक्तीसाठी विठोबाची मूर्ती आपल्या राज्यात नेली होती; पण ती एकनाथांचे पणजोबा भानुदास यांनी परत आणली.सोळखांबी मंडपात त्यांची समाधी असून आत जाताना उजव्या हाताच्या पहिल्या पादुका हीच त्यांची समाधी होय. स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर जीणोर्द्धार करण्यात आलेलं पांडुरंगाचं मंदिर हे १६, १७ आणि १८ व्या शतकातलं बांधकाम असावं, असा जाणकारांचा अंदाज आहे. असं असलं तरीही मूळ मंदिराचे १२ व्या शतकातले अवशेष अजूनही तिथे आढळतात. या देवळाच्या दक्षिणेला खंडोबाव्यंकटेश अशा देवतांची लहान लहान देवळंही आहेत.

श्री विठ्ठल मुर्ती

पंढरपूर मंदिरात विठुरायाची मूर्ती स्वयंभू असून वालुकामय शिलेची आहे. श्रींच्या मस्तकी मुकुटासारखी उंच कंगोरेदार टोपी ज्याचा आकार शिवलिंगासारखा आहे. श्रींचे मुख उभट, गाल फुगीर, दृष्टी समचरण आहे. कानी मकर कुंडले तर गळ्यात कौस्तुभमणी आहे. पाठीवर शिंके आणि ह्रदयस्थानी श्रीवत्सलांछन आहे. श्रींच्या दोन्ही दंडावर अंगद असून मनगटावर मणिबंध आहेत. श्री विठ्ठलाने हात कटेवर ठेवलेले असून उजव्या हातात कमळाचा देठ असून हात उताणा, अंगठा खाली येईल असा टेकविला आहेत तर डाव्या हातात शंख आहे. श्रींचे कमरेला तिहेरी मेखला असून छातीवर उजवीकडे भृगुऋषींनी पादस्पर्श केलेली खूण आहे. ब्रह्मदेव निघालेली नाभी आणि कमरेला वस्त्र ज्याचा सोगा पावलापर्यंत आहे. डाव्या पायावर मृतकेषी नावाचे दासीने बोट लावलेची खूण आहे. अशी दगडी विटेवर उभी असलेली मूर्ती आहे. 
 

पंढरपूर वारी - Pandharpur Vari

वारी म्हणजे पांडूरंगाच्या भेटीला पंढरपुराला पायी जायचे. वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात. वारीत अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात, कथा करीत पंढरपूरला पायी जातात. त्यांच्या समूहाला ‘दिंडी’ असे म्हणतात.  वर्षातील आषाढ शुक्ल एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून भक्त पायी प्रवास करुन पंढरपूरात भगवान श्रीविठ्ठ्लाच्या दर्शनास येतात.
 
वारीची ही प्रथा फार जुनी आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांचे वडील दिंड्यातील वारीला जात होते, असे सांगितले जाते. मुख्य चार वार्‍या असतात ज्यात चैत्री यात्रा असते ज्यात पंढरपुरात चैत्र शुद्ध एकादशीस म्हणजेच कामदा एकादशीस यात्रा भरते. दुसरी आषाढी यात्रा जी पंढरीतील महायात्रा म्हणून ओळखली जाते. आषाढ महिन्यातील शुद्ध एकादशीस ही यात्रा भरते. या एकादशीस देवशयनी एकादशी म्हणतात. या दरम्यान संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कानाकोपर्‍यातुन पंढरीकडे श्रीविठ्ठल दर्शनासाठी येतात. “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” आणि “जय जय राम कृष्ण हरी” या नामघोषाने सारे वातावरण भारून जाते. तिसरी कार्तिकी यात्रा जी कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीस पंढरपुरात साजरी केली जाते. शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत या दिवशी उठतात. आणि चौथी माघी यात्रा माघ महिन्यातील शुद्ध एकादशीस भरते. या एकादशीस जया एकादशी म्हणतात.

पंढरपूरमधील प्रेक्षणीय स्थळे

  • विठ्ठल-रुक्मिणी मंदिर: हे पंढरपूरमधील मुख्य मंदिर आहे.
  • पुंडलिक समाधी: पुंडलिक हे भगवान विठ्ठलाचे परम भक्त होते.
  • चंद्रभागा नदी: भाविक चंद्रभागा नदीत स्नान करतात.
  • संत नामदेव मंदिर: संत नामदेव हे महाराष्ट्रातील एक महान संत होते.
  • संत तुकाराम मंदिर: संत तुकाराम हे महाराष्ट्रातील एक महान संत होते.

महाराष्ट्रातील काही शहरापासून अंतर

पुणे ते पंढरपूर –
मुंबई ते पंढरपूर –
छ. संभाजी नगर ते पंढरपूर – ३५८.२
नाशिक ते पंढरपूर –
नागपूर ते पंढरपूर – 
नांदेड ते पंढरपूर
जालना ते पंढरपूर
परभणी ते पंढरपूर
नगर ते पंढरपूर
कोल्हापूर ते पंढरपूर

पंढरपूर यात्रेचे काही टिप्स

  • गर्दी टाळण्यासाठी तुम्ही ऑफ सीझनमध्ये पंढरपूरला जाऊ शकता.
  • तुम्ही तुमच्यासोबत पुरेसे पाणी आणि अन्न घेऊन जा.
  • तुम्ही तुमच्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवा.
  • तुम्ही पंढरपूरच्या नियमांचे पालन करा.

Pandharpur temple

Pandharpur

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to top