santoshi mata aarti

श्री संतोषी मातेची आरती | Santoshi Mata Aarti in Pdf

जय देवी श्री देवी संतोषी माते।
वंदन भावे माझे तव पदकमलाते।।धृ।।
श्रीलक्ष्मीदेवी तूं श्रीविष्णूपत्नी।
पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नी।।
जननी विश्वाची तू जीवन चिच्छक्ती।
शरण तुला मी आलो नुरवी आपत्ती।।१।।

गुरूवारी श्रध्देने उपास तव करिती।
आंबट कोणी काही अन्न न सेवीती।।
गूळ चण्याचा साधा प्रसाद भक्षीती।
मंगल व्हावे म्हणूनी कथा श्रवण करिती।।२।।

जे कोणी नरनारी व्रत तव आचरिती।
अनन्य भावे तुजला स्मरूनी प्रार्थती।।
त्याच्या हाकेला तू धावूनिया येसी ।
संतती वैभव कीर्ती धनदौलत देसी।।३।।

विश्वाधारे माते प्रसन्न तू व्हावे।
भवभय हरूनी आम्हा सदैव रक्षावे।।
मनीची इच्छा व्हावी परिपूर्ण सगळी।
म्हणूनी मिलिंद माधव आरती ओवाळी।।४।।