
पांडुरंगाची आरती | Pandurangachi Aarti
युगे अठ्ठावीस विटेवरी उभा ।
वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा ।
पुंडलिकाचे भेटी परब्रम्ह आले गा |
चरणी वाहे भीमा उध्दरी जगा |
जय देव जय देव जय पांडुरंगा |
रखुमाईवल्लभा राईच्या वल्लभा पावे जिवलगा || १ ||
तुळसीमाळा गळां कर ठेवुनि कटीं ।
कांसे पीतांबर कस्तुरी लल्लाटी।
देव सुरवर नित्य येती भेटी ।
गरूड हनुमंत पुढे उभे राहती || २ ||
धन्य वेणूनाद अनुक्षेत्रपाळा |
सुवर्णाची कमळे वनमाळा गळा |
राई रखुमाबाई राणीया सकळा |
ओवाळीती राजा विठोबा सावळा || ३ ||
ओवाळू आरत्या कुरवंडया येती ।
चंद्रभागेमाजी सोडूनिया देती ।
दिंडया पताका वैष्णव नाचती ।
पंढरीचा महिमा वर्णावा किती || ४ ||
आषाढी कार्तिकी भक्तजन येती ।
चंद्रभागेमाजी स्नाने जे करिती ।
दर्शनहेळामात्रेतयां होय मुक्ती ।
केशवासी नामदेव भावें ओवाळीती || ५ ||
श्री पांडुरंगाची आरती PDF डाउनलोड (Pandurangachi Aarti PDF Download)
जर तुम्हाला संपूर्ण आरती PDF स्वरूपात पाहायची किंवा डाउनलोड करायची असेल, तर खालील बटणावर क्लिक करा.