संत नामदेव महाराजांची आरती

संत नामदेव महाराजांची आरती (Sant Namdev Maharaj Aarti) ही त्यांच्या भक्तिभावनेचा आणि ईश्वरप्रेमाचा गौरव करणारी एक भक्तिपूर्ण स्तुती आहे. ही आरती संत नामदेव महाराजांच्या चरणी श्रद्धा, भक्ती आणि समर्पण व्यक्त करण्यासाठी गायली जाते. त्यांनी भगवंताची उपासना करत लोकांना नामस्मरणाचे महत्त्व पटवून दिले. खाली संत नामदेव महाराज यांची आरती दिली आहे:

संत नामदेव आरती | Sant Namdev Maharaj Aarti

जन्मता पांडुरंगे | जिव्हेवरी लिहिले | शतकोटी अभंग | प्रमाण कवित्व रचिले || १ ||

जय जयाजी भक्तरायां | जिवलग नामया | आरती ओवाळिता | चित्त पालटे काया || धृ.||

घ्यावया भक्तिसुख | पांडुरंगे अवतार |धरुनियां तीर्थमिषें | केला जगाचा उद्धार || जय.|| २ ||

प्रत्यक्ष प्रचीती हे | वाळवंट परिस केला | हारपली विषमता | द्दैतबुद्धी निरसली || जय.|| ३ ||

समाधि माहाद्वारी श्रीविठ्ठलचरणी | आरती ओवाळितो | परिसा कर जोडू || जय जयाजी||४ ||

श्री गजानन महाराज आरती PDF डाउनलोड करा