
श्री खंडोबाची आरती | Khandoba Aarti in Marathi
पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा ।
खंडामंडित दंडित दानव अवलीळा ।।
मणिमल्लां मर्दुनियां जो धूसुर पिवळा ।
हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ।। १ ।।
जय देव जय देव जय शिव मल्हारी ।
वारी दुर्जन असुरां भवदुस्तर तारी ॥ धृ ॥
सुरवर संबर वर दे मजलागी देवा ।
नाना नामे गाईन ही तुमची सेवा ।।
अघटित गुण गावया वाटतसे हेवा ।
फणिवर शिणला किती नर पामर केवा ॥ जय ॥ २ ॥
रघुवीरस्मरणी शंकर हृदयीं निवाला ।
तो हा मल्लंतक अवतार झाला ।।
यालागी आवडे भाव वर्णिला ।
रामी रामदासा जिवलग भेडला ॥ जय ॥ ३॥
श्री खंडोबाची महाराज आरती PDF डाउनलोड कसे करावे?
जर तुम्हाला PDF स्वरूपात हवी असेल, तर खालील लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करू शकता.