पंचानन हयवाहन सुरभूषितनीळा । खंडामंडित दंडित दानव अवलीळा ।। मणिमल्लां मर्दुनियां जो धूसुर पिवळा । हिरे कंकण बासिंगे सुमनांच्या माळा ।। १ ।। जय देव जय देव जय शिव मल्हारी । वारी दुर्जन असुरां भवदुस्तर तारी ॥ धृ ॥ सुरवर संबर वर दे मजलागी देवा । नाना नामे गाईन ही तुमची सेवा ।। अघटित गुण गावया वाटतसे हेवा । फणिवर शिणला किती नर पामर केवा ॥ जय ॥ २ ॥ रघुवीरस्मरणी शंकर हृदयीं निवाला । तो हा मल्लंतक अवतार झाला ।। यालागी आवडे भाव वर्णिला । रामी रामदासा जिवलग भेडला ॥ जय ॥ ३॥
श्री खंडोबाची महाराज आरती PDF डाउनलोड कसे करावे? | Download Khandoba Aarti
जर तुम्हाला PDF स्वरूपात हवी असेल, तर खालील लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करू शकता.