
श्री गजानन महाराज आरती | Gajanan Maharaj Aarti in Marathi
जय जय सच्चित्स्वरूप स्वामी गणराया ।
अवतरलासी भूवर जड मूढ ताराया ।। धृ ।।
निर्गुण ब्रह्म सनातन अव्यय अविनाशी ।
स्थिरचर व्यापुन उरले जे या जगतासी ।।
तें तूं खरोखर निःसंशय अससी ।
लीलामात्रें धरिलें मानव देहासी ॥ १ ॥
होऊं न देशी त्याची जाणिव तूं कवणा ।
करुनी गणि गण गणात बोते या भजना ।।
धाता हरिहर गुरुवर तूंचि सुखसदना ।
जिकडे पहावे तिकडे तूं दिससी नयना ॥ २॥
लीला अनंत केल्या बकटसदनास ।
पेटविले त्या अग्नीवांचुनि चिलमेस ।।
क्षणांत आणिले जीवन निर्जल वापीस ।
केला ब्रह्मगिरीच्या गर्वाचा नाश ।। ३ ।।
व्याधि वारुन केले कैकां संपन्न ।
करविलें भक्तांलागी विठ्ठल दर्शन ।।
भवसिंधु हा तरण्या नौका तव चरण ।
स्वामी दासगणूचे मान्य करा कवन ।। ४ ।।
श्री गजानन महाराज आरती PDF डाउनलोड कसे करावे?
जर तुम्हाला PDF स्वरूपात हवी असेल, तर खालील लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करू शकता.