श्री दत्ताची आरती - दत्तात्रेय भगवानांची आरती गायन करत असलेले भक्त. धार्मिक पूजा आणि भक्तिभावाने केलेली आरती.

दत्ताची आरती | Shri Guru Datta Aarti in Marathi

त्रिगुणात्मक त्रैमूर्ति दत्त हा जाणा ।

त्रिगुणी अवतार त्रैलोक्यराणा ।
नेति नेति शब्द न ये अनुमाना ।
सुरवर-मुनिजन-योगी-समाधि न ये ध्याना ।। १ ।।
जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता ।
आरती ओवाळीता हरली भवचिंता ।। धृ० ।।
सबाह्य अभ्यंतरी तू एक दत्त ।
अभाग्यासी कैंची कळेल ही मात ।
पराही परतली तेथे कैंचा हेत ।
जन्ममरणाचा पुरलासे अंत ।। २ ।।
दत्त येऊनिया उभा ठाकला ।
सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला ।
प्रसन्न होऊनी आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकविला ।। ३ ।।
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान ।
हारपले मन झाले उन्मन ।
मीतूपणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्री दत्तध्यान ।। ४ ।।

दत्ताची आरती PDF डाउनलोड कसे करावे?

जर तुम्हाला PDF स्वरूपात हवी असेल, तर खालील लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करू शकता.

📥 दत्ताची आरती PDF डाउनलोड