
Shree Vinayaka Aarti श्री गणेश विनायक आरती | आरती गजबदन विनायक की | Hindi Lyrics, अर्थ व महत्व
श्री गणेशाला गणनायक, विघ्नहर्ता आणि मंगलकर्ता म्हणून ओळखले जाते. प्रत्येक शुभकार्याच्या सुरुवातीला प्रथम गणपतीची पूजा केली जाते आणि त्यानंतर आरती गातली जाते.
“आरती गजबदन विनायक की” ही गणपतीची प्रसिद्ध आरती आहे जी उत्तर भारतात अधिक प्रचलित आहे. ही आरती गाण्याने आयुष्यातील अडथळे दूर होतात, घरात सुख-समृद्धी व ज्ञानाची वृद्धी होते.
आरती गजबदन विनायक की – हिंदी लिरिक्स
॥ आरती गजबदन विनायक की ॥
आरती गजबदन विनायक की।
सुर-मुनि-पूजित गणनायक की॥
आरती गजबदन विनायक की।
सुर-मुनि-पूजित गणनायक की॥
आरती गजबदन विनायक की॥
एकदन्त शशिभाल गजानन,
विघ्नविनाशक शुभगुण कानन।
शिवसुत वन्द्यमान-चतुरानन,
दुःखविनाशक सुखदायक की॥
आरती गजबदन विनायक की॥
ऋद्धि-सिद्धि-स्वामी समर्थ अति,
विमल बुद्धि दाता सुविमल-मति।
अघ-वन-दहन अमल अबिगत गति,
विद्या-विनय-विभव-दायक की॥
आरती गजबदन विनायक की॥
पिङ्गलनयन, विशाल शुण्डधर,
धूम्रवर्ण शुचि वज्रांकुश-कर।
लम्बोदर बाधा-विपत्ति-हर,
सुर-वन्दित सब विधि लायक की॥
आरती गजबदन विनायक की॥
आरतीचा अर्थ (सोप्या भाषेत)
गणपती हा देवता, ऋषी व सर्व मुनिजनांनी पूजलेला गणनायक आहे. तो विघ्नविनाशक आहे आणि भक्तांना सुख, बुद्धी व ज्ञान प्रदान करतो. त्याच्याकडे ऋद्धी-सिद्धी असून तो विवेक, विनय आणि वैभव देतो. लांब सोंड असलेला, विशाल अंगाचा गणपती भक्तांच्या संकटांचे निवारण करणारा आहे
श्री विनायक आरती PDF डाउनलोड कसे करावे?
जर तुम्हाला आरती गजबदन विनायक की PDF स्वरूपात हवी असेल, तर खालील लिंकवर क्लिक करून ती सहज डाउनलोड करू शकता.