आरती एकनाथा |महाराजा समर्था |त्रिभुवनी तूंचि थोर |जगदगुरू जगन्नाथा || ध्रु. ||एकनाथ नाम सार |वेदशास्त्रांचे गूज |संसारदु:ख नाम |महामंत्राचे बीज | आरती || १ ||एकनाथ नाम घेतां |सुख वाटले चित्ता |अनंत गोपाळदासा |धणी न पुरे गातां |आरती एकनाथा | महाराजा समर्था || २ ||