आरती तुकाराम ।स्वामी सद्गुरु धाम ॥सच्चिदानंद मूर्ती ।पाय दाखवी आम्हा ॥
राघवे सागरात ।पाषाण तारीले ॥तैसे हें तुकोबाचे ।अभंग उदकी रक्षिले ॥आरती तुकाराम ॥
तुकिता तुलनेसी ।ब्रह्म तुकासी आले ॥म्हणोनि रामेश्वरे ।चरणी मस्तक ठेविले ॥
Download aarti in pdf