देवीची आरती मराठीत | Durga Aarti Marathi PDF डाउनलोड

देवीची आरती - Devichi Aarti - देवीची आरती PDF डाउनलोड

दुर्गे दुर्घट भारी तुजवीण संसारी
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी
वारी वारी जन्म मरण तेवारी
हारी पडलो आता संकट नेवारी
जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी
जय देवी जय देवी ॥१॥

तुजवीण भुवनी पाहत तुज ऐसे नाही
चारी श्रमले परंतु न बोलवे काही
साही विवाद करिता पडिलो प्रवाही
ते तू भक्ता लागे ते तू दस लागे पावस लवलाही
जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी
जय देवी जय देवी ॥२॥

प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदासा
क्लेशांपासून तोडी होई भोपाषा
आंबे तुजवाचून कोण पुरवी आशा
नरहर तल्लीन झाला पद पंकज लेशा
जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी
सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी
जय देवी जय देवी ॥३॥

देवीची आरती PDF डाउनलोड कसे करावे?

जर तुम्हाला PDF स्वरूपात हवी असेल, तर खालील लिंकवर क्लिक करून ती डाउनलोड करू शकता.

📥 देवीची आरती PDF डाउनलोड