
श्री तुळशीची आरती | Tulshichi Aarti
जय देवी जय देवी जय माये तुळशी ।।
निजपत्राहुनि लघुतर त्रिभुवन हें तुळिसी ।।धृ०।।
ब्रह्मा केवळ मुळीं मध्ये तो शौरी ।।
अग्रीं शंकर तीर्थे शाखापरिवारों ।।
सेवा करिती भावें सकळही नरनारी ।।
दर्शनमात्रे पापें हरती निर्धारीं ।।
जय देवी जय देवी० ।। १ ।।
शीतळ छाया भूतळ व्यापक तूं कैसी ।।
मंजरीची आवड कमलारमणासी ।।
तव दलविरहित विष्णू राहे उपवासी ।।
विशेष महिमा तुझा शुभ कार्तिकमासी ।।
जय देवी जय देवी० ।। २ ।।
अच्युत माधव केशव पीतांबरधारी ।।
तुझिया पूजनकाळीं जो हें उच्चारी ।।
त्यासी देसी संतति संपत्ति सुखकारी ।।
गोसावीसुत विनवी मजला तू तारीं ।।
जय देवी जय देवी० ।। ३ ।।