सूचना! आपल्याला नोंदणी करण्या अगोदर रेजिस्ट्रेशन करावे लागेल त्या नंतर लॉगिन करून नोंदणी करावी

grishneshwar jyotirlinga

घृष्णेश्वर मंदिर | Grishneshwar Jyotirlinga Temple

घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर असून ते १२ ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दौलताबाद पासून सुमारे ११ कि.मी. अंतरावर आणि वेरूळ लेण्यांजवळ हे मंदिर आहे. शिवपुराण, स्कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथांत या ठिकाणाचे उल्लेख मिळतात.

मंदिराचे बांधकाम

वेरूळ गावातील येलगंगा नदीजवळ हे मंदिर असून शिवाजी महाराज यांचे आजोबा आणि शहाजीराजे भोसले यांचे वडील मालोजीराजे भोसले यांनी या मंदिराचा प्रथमतः १६ व्या शतकात जीर्णोद्धार केला. सध्याचे अस्तित्वात असलेले मंदिर इ.स. १७३० मध्ये मल्हारराव होळकरांच्या पत्नी गौतमीबाईंनी बांधलेले असून नंतर शिवभक्त अहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा परत एकदा जीर्णोद्धार केला. मंदिराचे बांधकाम लाल रंगांच्या दगडामध्ये करण्यात आले आहे. या मंदिराचे नक्षीकाम अवर्णनीय आहे.

घृष्णेश्वर मंदिराची खास वैशिष्ट्ये

लाल खडकांनी बांधलेले हे मंदिर पाच-स्तरीय शिखर किंवा शिकाराने बनलेले आहे. आपण लाल दगडात कोरलेले भगवान विष्णूचे दशावतार (दहा अवतार) पाहू शकता. 
येथे 24 खांबांवर बांधलेला एक दरबार हॉल आहे ज्यावर तुम्हाला भगवान शिवाच्या विविध दंतकथा आणि पौराणिक कथा कोरल्या जातील. गर्भगृहात पूर्वाभिमुख लिंग आहे. कोर्ट हॉलमध्ये तुम्हाला भगवान शिवाच्या पर्वताची, नंदीची, बैलाची मूर्ती देखील आढळेल.

राष्ट्रीय संरक्षित स्मारक

या मंदिराला २७ सप्टेंबर, इ.स. १९६० रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले.

Grishneshwar jyotirlinga

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to top