सूचना! आपल्याला नोंदणी करण्या अगोदर रेजिस्ट्रेशन करावे लागेल त्या नंतर लॉगिन करून नोंदणी करावी

aundha nagnath

औंढा नागनाथ | Aundha Nagnath

बारा ज्योतिर्लिंग हे भारतातील हिंदूंचे तीर्थक्षेत्र आहेत. त्यातील पाच महाराष्ट्रात आहेत. शतकानुशतके या ठिकाणी शिवांची पूजा केली जाते.
औंढा नागनाथ Aundha Nagnath हे त्यापैकी एक आहेत. अनुज्ञान नागनाथ हिंगोली जिल्ह्यात आहेत 12 ज्योतिर्लिंगांपैकी हा आठवा (आद्या) मानला जातो म्हणून हा तीर्थयात्रा केंद्र महान महत्व आहे. असे मानले जाते की, धर्माराज (पांडवपैकी सर्वात मोठे) याने हेस्तिनापूरला 14 वर्षांपासून निर्वासित केले होते. नागनाथ मंदिराला उत्तम कोरीव काम आहे. मंदिर हेमाडपंती वास्तुशिल्प आहे आणि सुमारे 60,000 चौरस फूट क्षेत्रावर स्थित आहे. शिवरात्री आणि विजयादशमी वर मोठ्या संख्येने यात्रेकरू या मंदिरात येतात.

इतिहास Aundha Nagnath History

१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले औंढा नागनाथ Aundha Nagnath हे हिंगोली जिल्ह्यातील पवित्र तीर्थक्षेत्र आहे. यालाच ‘अष्टम ज्योतिर्लिंग श्री नागेश्वर ज्योतिर्लिंग’ असे म्हणतात. या शहराचे सध्याचे नाव हे ‘औंढा’ असून पूर्वीच्या काळी याचे नाव हे ‘दारुकावण’ असे होते.

पांडवकालीन इतिहास Aundha Nagnath

पांडव हे कौरवांकडून द्यूतामध्ये हरल्यावर, त्यांना द्यूताच्या अटीनुसार १२ वर्षांचा वनवास व एका वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची शिक्षा झाली. यादरम्यान पांडव भारतभर फिरले. फिरता–फिरता ते या दरुकवनात आले होते आणि या ठिकाणी त्यांच्यासोबत एक गाय होती ती गाय रोज तेथील सरोवरात उतरून दूध सोडत होती. असे एकदा भीमाने पाहिले आणि पुढच्या दिवशी त्या गाईच्या पाठोपाठ त्या सरोवरात तो उतरला आणि त्याला महादेवाचे दर्शन झाले मग त्याला समजले की ती गाय रोज त्या शिवलिंगावर दूध सोडत होती. 

मग पाचही पांडवांनी ते सरोवर नष्ट करण्याचे ठरवले. आणि विर भीमाने आपल्या गदा प्रहरणे त्या सरोवराच्या चारही बाजूंनी पाणी बाहेर काढले आणि सर्वांनी महादेवाचे दर्शन केले श्री कृष्णाने त्यांना त्या शिवलिंग विषयी माहिती सांगितली आणि सांगितले हे नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे. मग पाच पांडवांनी त्या ठिकाणी भूतलावर स्थित असलेल्या ज्योतिर्लिंगाचे एक भव्य असे अखंड दगडाचे मंदिर बांधले.

यादवकालीन इतिहास

कालांतराने हे सध्याचे मंदिर सेउना (यादव) घराण्याने हेमाडपंथी शैलीने बांधले होते आणि ते १३व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते हे मंदिर सात मजली दगडाच्या इमारतिचे होते .

इ.स.१६०० नंतरचा इतिहास

नंतर छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात औरंगजेबाने या मंदिराच्या इमारती ध्वस्त केल्या होत्या, औरंगजेबाच्या विजयात हे मंदिर नष्ट झाले. सध्याचे उभे असलेले मंदिरचे शिखर हे अहिल्याबाई होळकर यांनी मंदिराचा जिर्णोद्धार करून मंदिराचे शिखर पुन्हा बांधले. आणि ते आजही आपल्याला पाहायला भेटते.

औंढा नागनाथ मंदिर Aundha Nagnath Temple

जमीनीच्या पृष्ठ भागावर मंदिराची रचना
या मंदिराची उंची 100 फूट एवढी असून मंदिराला कुठलाही पाया नसून जमीनीच्या पृष्ठ भागावर या मंदिराची रचना केली केली आहे. तर संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या काळात संत नामदेव महाराज कीर्तन करत असतांना मंदिराने आपली जागा बदलली असल्याचा येथील भाविकांचा समज आहे.

बाहेरुन मंदिराचे दोन भाग पाहायला मिळतात पूर्वी मोघल साम्राज्यात येथील मंदिराचा काही भाग मोघलांनी पाडला असल्याचं सांगितलं जाते. यानंतरच्या काळात आहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करुन मंदिराच्या कळसाची स्थापना केली असल्याचं इतिहासात नोंद आहे. म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगभरातून भाविक येथे येतात.

Aundha Nagnath Temple
Aundha Nagnath Temple
Aundha Nagnath

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to top