सूचना! आपल्याला नोंदणी करण्या अगोदर रेजिस्ट्रेशन करावे लागेल त्या नंतर लॉगिन करून नोंदणी करावी

Alandi devachi

आळंदी -Alandi Devachi

आळंदी देवाची  – हे महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे.[१]महाराष्ट्रातील प्रसिद्ध संत संत ज्ञानेश्वर यांचे आळंदी हे समाधिस्थान आहे.

ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व - Alandi Temple

संत ज्ञानेश्वरांनी आपल्या जीवनातील काही काळ येथे व्यतीत केला. या आळंदी गावाला “देवाची आळंदी” असे म्हणतात, कारण चोराची आळंदी आणि म्हातोबाची आळंदी या नावाची आणखी गावे पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात आहेत. ही देवाची आळंदी पुण्यापासून पंचवीस किलोमीटरवर आहे. वारकरी लोकांसाठी तसेच समस्त मराठी जनांसाठी या आळंदीला मोठे महत्त्व आहे. ज्ञानेश्वरांनी वयाच्या एकविसाव्या वर्षी येथे 1296 साली जिवंत समाधी घेतली. त्या जागी एक सुंदर समाधिमंदिर १५७० (की १५४०?) मध्ये बांधण्यात आले असे सांगितले जाते.

आषाढ महिन्यातील एकादशीला आळंदीहून निघून पंढरपूरला ज्ञानेश्वरांची पालखी जाते. या पालखीसोबत लाखो वारकरी अंदाजे २१६ किमी अंतर पायी चालत पंढरपूरला विठोबाच्या दर्शनासाठी जातात.

आळंदीतील इतर प्रेक्षणीय स्थळे :-

  • माऊलींच मंदिर
  • इंद्रायणी नदी
  • कृष्ण मंदिर
  • मुक्ताई मंदिर
  • राम मंदिर
  • विठ्ठल रखुमाई मंदिर
  • स्वामी हरिहरेंद्र मठ
  • छत्रपती संभाजी महाराज समाधी, तुळापूर

गजानन महाराज मंदिर आळंदी - Gajanan Maharaj Mandir Alandi

gajanan maharaj mandir alandi
gajanan maharaj mandir alandi
Alandi Devachi

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to top